भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे

भेसळयुक्त खव्याचे राज्यात ठिकठिकाणी अड्डे
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. यातील बहुतांश खाद्यपदार्थ खव्यापासून बनतात. मात्र, मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणत भेसळयुक्त खव्याची विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सात ते आठ हजार किलो भेसळयुक्त खवा राज्यात दरदिवशी विक्री केला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामध्ये गुजरातमधून येणार्‍या बर्फीचा वाटा मोठा आहे.

का होतेय भेसळ?

गेल्या दीड वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट, पशुखाद्यात झालेली मोठी वाढ व नुकताच बसलेला पावसाचा फटका. यामुळे अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील दुग्ध उत्पादन कमी केले. तसेच व्यवसायातील स्पर्धेमुळे खासगी डेअर्‍यांनी मोठी दरवाढ करून दूध खरेदी केली.

परिणामी, खवा भट्टीकडे येणार्‍या दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांची संख्या कमी झाली. तयार होणार्‍या उत्पादनाच्या तुलनेत तेजीमध्ये असलेल्या मालाचा पुरवठा कमी पडू लागला. त्यामुळे आता या पट्ट्यातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे व्यापारी सोडता सर्वांनीच सांगली व कर्नाटकातील जमखंडी येथून येणार्‍या चांगल्या दर्जाच्या खव्यात भेसळ करून विक्री करण्यास सुरुवात केली आहे. सात ते आठ हजार टन खवा या परिसरातून आणून चांगल्या दर्जाच्या खव्याच्या नावाने विक्री केला जातो आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आल्याचे काही नागरिक सांगतात. मात्र, त्यांच्याकडूनही या बनावट खवा विक्रीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे माफियांनी भेसळयुक्त खवा विक्रीचा सपाटाच लावला आहे.

पुण्यातील बुधवार पेठेत आवक

सांगलीचा हा खवा पुण्यात बुधवार पेठेत येतो. तेथून तो संपूर्ण शहरासह जिल्ह्यात वितरीत होतो. सणासुदीच्या काळात याची मोठी विक्री येथून केली जाते. खरेदीची किंमत कमी असल्यामुळे मिठाईवाले पेढे तयार करण्यासाठी या खव्याचा वापर करतात. शेवटी आर्थिक तुंबड्या भरण्याच्या नादात हे माफिया नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत.

भेसळ
या शहरांत भेसळयुक्त खव्याची चलती

राज्यात औरंगाबाद, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई, बारामती, अहमदनगर, नाशिक, शिर्डी या प्रमुख शहरांसह बाहेरच्या राज्यांतील विजापूर, हैदराबाद, गुलबर्गा या ठिकाणच्या मिठाई विक्रेत्यांना मराठवाड्यातील येरमाळा, सरमकुंडी फाटा, नांदूरघाट, धारूर, चौसाळा, भूम व केज येथे खव्याचे वितरण केले जाते. येथील सर्वात मोठी बाजारपेठ येरमाळा व सरमकुंडी फाटा येथे आहे. येथून दररोज 9 ते10 हजार टन खवा वितरित केला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news