भूकंपाची तीव्रता आणि आपत्ती व्यवस्थापन

 Earthquake
Earthquake
Published on
Updated on

अलीकडेच नेपाळ, चीन आणि भारताला जाणवलेले भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे नव्हते. हिमालयाच्या परिसरात भूकंप होणे ही आश्चर्यकारक बाब नसली तरी या नैसर्गिक घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण, हिमालयाची व्याप्ती अधिक असल्याने आपल्याला तेथील लहान धक्कासुद्धा मोठा हादरा देणारा ठरू शकतो.

मंगळवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी रात्री नेपाळ, चीन आणि भारताला बसलेले भूकंपाचे धक्के ही सामान्य नैसर्गिक घटना नाही. त्याचे केंद्र नेपाळमधील मणिपूर होते. भूगोलाच्या हिशेबाने 'इंडियन टॅक्टोनेट' पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत पसरला आहे. त्यात आपला पूर्वोत्तर भाग, हिंदुकुश, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या काही भागाचा समावेश आहे. या ठिकाणी इंडियन प्लेट हे आपल्यापेक्षा वजनाने अधिक असलेल्या युरोशियन प्लेटच्या आत जात असून, त्यांचा संघर्ष होत आहे. म्हणून हिमालय वर उचलला जात नसून संपूर्ण भागच भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील होत आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केलवर नोंदली गेली आहे; परंतु पूर्वीच्या काळी यापेक्षा अधिक शक्तिशाली हादरे बसलेले आहेत. नेपाळमधील 1934 चा विनाशकारी भूकंप हा ज्वलंत उदाहरण आहे.

हिमालयाच्या परिसरात भूकंप होणे ही आश्चर्यकारक बाब नसली तरी या नैसर्गिक घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण, हिमालयाची व्याप्ती अधिक असल्याने तेथील लहान धक्कासुद्धा मोठा हादरा देणारा ठरू शकतो. या ठिकाणची स्थिती पाहिल्यास भविष्यात 8 रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली आहे. साहजिकच तेवढ्या तीव्रतेचा भूकंप झाल्यास नेपाळ किंवा सीमाभागात किंवा दिल्ली, उत्तरप्रदेश या भारतातील राज्यांत हाहाकार उडू शकतो. ऑगस्ट 1988 मध्ये बिहारमध्ये झालेला भूकंप विसरलेलो नाही.

सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे भूकंपाचा अंदाज वर्तविला जात नाही. तसेच किरकोळ धक्क्याच्या आधारे मोठ्या भूकंपाची शंकादेखील व्यक्त करता येऊ शकत नाही. अर्थात, काही तंत्रज्ञानाच्या पातळीवर व्यावहारिक उपाय करता येऊ शकतात. उदा. इशारा देणारी चांगली यंत्रणा. वास्तविक भूकंपात दोन प्रकारच्या लाटा येतात. एक 'पी' आणि दुसरी 'एस'. दोन्हीत वेळेचे अंतर असते. 'पी' लाट ही स्वभावामुळे नुकसान करत नाही. मात्र, 'एस' लाट ही तुलनेने अधिक धोकादायक असते. उदा. दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात, तेव्हा 'पी' लाट तयार होते. उदा. भूकंपाचे केंद्र नेपाळ असेल तर 'पी वेब'ला दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी काही सेकंद लागतील. त्यानंतर 'एस' आकाराची लाट तयार होईल. ती सारख्या अंतरानेच दिल्लीला पोहोचेल.

आपण 'पी वेब'ला केंद्रावर मोजले आणि त्याची तत्काळ माहिती दिल्लीला दिली तर 'एस वेब'च्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक मिनिटापेक्षा कमी वेळ असेल. यात मेट्रो, अणुऊर्जा केंद्र, आपत्कालीन आरोग्य सेवा यांसारख्या सेवांचा बचाव करण्यासाठी उपाय करता येऊ शकतो. मेक्सिकोसारख्या देशात अशाच प्रकारची यंत्रणा विकसित केली असून, त्यानुसार बचावाचे प्रयत्न केले जातात. तेथे भूकंपापासून वाचण्यासाठी संस्थांंना एक ते दीड मिनिटांचा कालावधी लागतो.

त्याचबरोबर स्थानिक पातळीवरदेखील अनेक उपाय करता येऊ शकतात आणि ते महत्त्वाचे आहेत. उदा. भूकंपविरोधी घर तयार करणे. अर्थात, भूकंप माणसाचे जीव घेत नाहीत, इमारती घेतात. इमारत तयार करताना त्यात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मोठ्या तीव्रतेचा धक्कादेखील सहन करण्याची शक्ती बाळगू शकतो; परंतु आपल्या देशात 'बिल्डिंग कोड' असतानाही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. साहजिकच कायदा लागू करणार्‍या संस्थांची जबाबदारी निश्चित करावी लागेल

अर्थात, भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानंतर काही कमी तीव्रतेचे धक्के बसतात. यास आपण 'आफ्टर शॉक' असे म्हणतो. प्रत्यक्षात जमिनीच्या आत एखादा तुकडा हलतो किंवा जागा बदलतो, तेव्हा त्यास सेटल होणे किंवा नवीन ठिकाणी स्थिरस्थावर होईपर्यंत लहान-मोठे धक्के बसत राहतात; परंतु मोठा धक्का बसल्यानंतर तेवढ्याच तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसेल, असे अनेकांना वाटत राहते. शास्त्रज्ञांनी ही बाब फेटाळून लावली आहे. मोठ्या भूकंपाने इमारतीला थोडा जरी धक्का लागत असेल तर कदाचित लहान धक्कादेखील आपल्याला मोठा हादरा देऊ शकतो. या कारणामुळेच मंगळवारी मध्यरात्री मोठा धक्का बसल्यानंतर तत्काळ मोठा भूकंप होईल, अशी शक्यता वर्तविली गेली नाही. भारतात आता मोठ्या तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, या भीतीतून आपल्याला बाहेर यावे लागेल.

– अतींद्र के. शुक्ला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news