भारतीय समुद्रात प्रथमच ‘ब्लेनव्हीलेज बिकड व्हेल’चे दर्शन

भारतीय समुद्रात प्रथमच ‘ब्लेनव्हीलेज बिकड व्हेल’चे दर्शन

पणजी, पुढारी वृत्तसेवा : भारतीय समुद्रात प्रथमच 'ब्लेनव्हीलेज बिकड व्हेल' या माशाची दर्शन झाले. वास्को येथील भारतीय मच्छीमारी सर्व्हेक्षण संस्थेने ही कामगिरी केली आहे. संस्थेने डिसेंबर महिन्यात मंगळूर येथील सर्व्हेक्षणात या जातीच्या दोन मादा माशांची नोंद केली आहे. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा मासा अरबी समुद्रात मंगळूर किनार्‍यापासून सुमारे 1.4 किमी अंतरावर दिसला.

याबाबत संस्थेचे विभागीय संचालक डॉ. एस रामचंद्रन यांनी सांगितले की, हा मासा याआधी दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, मालदीव, ऑस्ट्रेलिया, तैवान, चीन आणि जपानच्या सागरी हद्दीत नोंदविला गेला होता. मात्र भारतीय समुद्री हद्दीत प्रथमच याची नोंद झाली आहे. संस्थेच्या अर्शद पी आर या तरुण संशोधकांनी याची छायाचित्रे काढली आहेत. हे सर्वेक्षण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजेननुसार सुरू आहे.

अर्शद पी आर यांनी सांगितले की, हा व्हेल मासा समुद्रात 200 ते 1400 मीटर खोलीवर आढळतो. याची लांबी साधरणपणे 15 फूट, तर वजन 1 हजार किलोपर्यंत असते. नर माशाच्या डोक्यावर शिंगासारखे दोन भाग असतात. हा मासा समुद्रात खोलवर राहणे पसंत करतो. तो काही क्षण श्वास घेण्यासाठी वर येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news