भारतीय ऑलिम्पिक संघटना अध्यक्षपदी पी टी उषा यांची निवड निश्चित

भारतीय ऑलिम्पिक संघटना अध्यक्षपदी पी टी उषा यांची निवड निश्चित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षपदी भारताची दिग्गज धावपटू पी टी उषा यांची निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी इतर कोणीही उमेदवारी दाखल केली नसल्याने उषा यांची निवड बिनविरोध होणार आहे. उषा यांनी शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक 10 डिसेंबर रोजी होणार आहे.

पी टी उषा यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटर अडथळा शर्यतीत अनेक सुवर्णपदके जिंकणार्‍या आणि 1984 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणार्‍या 58 वर्षीय उषा यांनी ट्विटमध्ये ही घोषणा केली होती. आयओए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची रविवारी शेवटची तारीख होती. आयओए निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर उमेश सिन्हा यांनी सांगितले होते की, शुक्रवार आणि शनिवारी उमेदवारी अर्ज आले नाहीत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news