बॉलीवूड बादशहा याच्या ब्रँड व्हॅल्यूला अखेर फटका

बॉलीवूड बादशहा याच्या ब्रँड व्हॅल्यूला अखेर फटका
Published on
Updated on

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर बॉलीवूड बादशहा किंग खान शाहरुख याची ब्रँड व्हॅल्यू धोक्यात आली आहे. आर्यनच्या अटकेनंतर 'बायजूस' या शैक्षणिक अ‍ॅपच्या अ‍ॅड-टेक प्रमुखांनी शाहरुख मॉडेल असलेल्या आपल्या जाहिरातींच्या प्रसारणावर तूर्त निर्बंध घातले आहेत.

शाहरुख खान 2017 मध्ये या अ‍ॅपचा ब्रँड अँबेसेडर बनला होता. त्यापोटी शाहरुखला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये शुल्क देण्यात येत होते. आर्यन वादात सापडल्यानंतर आता शाहरुखच्या या जाहिराती टेलिव्हिजनवर बघायला मिळणार नाहीत. अर्थात असल्या वादांचा परिणाम तत्कालिक असतोे. बायजूसचे हे निर्बंध दीर्घकाळासाठी हमखास नाहीत, असे जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बॉलीवूड बादशहा  शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू मागच्या वर्षी जवळपास 385 कोटी रुपयांची होती. जाहिरात चित्रीकरणापोटीच शाहरुख साडेतीन ते चार कोटी रुपये शुल्क आकारतो. शाहरुखने आजवर 40 ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत. बिगबास्केट, ह्युंदाई, फ्रूटी, डेकोर, फेअर अँड हँडसम, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स जिओ, दुबई पर्यटन अशी मोठी नावे यात समाविष्ट आहेत.

शाहरुख आणि गौरी या दाम्पत्याची एकूण संपत्ती 7 हजार 250 कोटी रुपये आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार 2021 मध्ये शाहरुख हा भारतातील चौथा सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटी आहे.

बायजूसला का घ्यावा लागला निर्णय?

आर्यनच्या अटकेनंतर समाजमाध्यमांतून शाहरुखचे ट्रोलिंग सुरू झाले होते. यूझर्सनी बायजूस या ब्रँडलाही ट्रोल करणे सुरू केले होते. बायजूस हे अध्यापन-अध्ययनाला वाहिलेले अ‍ॅप आहे. स्वत:च्या मुलाला शिकवू शकले नाहीत आणि चालले लोकांच्या मुलांना शिकवायला, अशा प्रकारच्या टीकेचा सामना शाहरुखला करावा लागला होता. बायजूस या स्टार्टअपची प्रतिष्ठाही त्यामुळे डावावर लागलेली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news