बेळगाव : दोन बसच्या धडकेत 20 जखमी

बेळगाव : दोन बसच्या धडकेत 20 जखमी

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत थांबलेल्या कॉलेज बसला केएसआरटीसी बसने मागून धडक दिली. यामध्ये दोन्ही बसमधील 20 हून अधिकजण जखमी झाले. गुुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास जत-जांबोटी राज्य महामार्गावरील गुर्लापूर (ता. मुडलगी) येेथे हा अपघात घडला.

मिळालेली माहिती अशी, गुर्लापूर येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यार्ंना घेण्यासाठी बस थांबली होती. यावेळी मागून येणार्‍या दुसर्‍या एका बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्याची जोरदार धडक थांबलेल्या बसला बसल्याने कॉलेज बस रस्त्याकडेच्या खड्ड्यात उतरली. या अपघातात कॉलेज बसमधील 10 विद्यार्थी, तर दुसर्‍या बसमधील 10 हून अधिक प्रवासी जखमी झाले.

18 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, तर दोघांच्या डोक्याला मार लागला. या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. किरकोळ जखमींवर उपचार करून सोडून देण्यात आले. याप्रकरणी केएसआरटीसी बसचालकावर मुडलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news