बुलडाणा : शिक्षिकेवरील प्रेमकविता व्हायरल; शिक्षकावर गुन्हा दाखल

crime
crime

बुलडाणा : एका विवाहित सहकारी शिक्षिकेवर एकतर्फी आकर्षणातून प्रेमाची कविता लिहून ती शाळेच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करणे एका शिक्षकाच्या अंगलट आले आहे.

पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. खामगाव येथे जि.प. प्राथमिक शाळेवर कार्यरत शिक्षक रोहिदास रामदास राठोड (वय 52) हा शाळेत कर्तव्यावर असताना काही दिवसांपासून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने या शिक्षिकेवर एक प्रेमकविता लिहून ती शाळेच्या ग्रुपवर व्हायरल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news