बांगलादेशात कट्टरवाद्यांनी हिंदूंची ६५ घरे जाळली

बांगलादेशात कट्टरवाद्यांनी हिंदूंची ६५ घरे जाळली

ढाका ; वृत्तसंस्था : बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सामूहिक हिंसाचार सुरूच असून हिंदू मंदिरांवरील तसेच हिंदू भाविकांवरील हल्ल्यांनंतर आता हिंदूंची घरेच पेटविण्याचे प्रकार या मुस्लिमबहुल देशात सुरू झाले आहेत. रंगपूर जिल्ह्यातील पीरगंज भागात सोशल मीडियावरील एका पोस्टचा बहाणा करून कट्टरवाद्यांचा जमाव हिंदूंच्या घरांवर चालून आला आणि आगी लावणे सुरू केले.

हिंदूंच्या 65 घरांना कट्टरवाद्यांनी आगी लावल्या. यापैकी 20 घरे पूर्णपणे खाक झाली आहेत. पीरगंजमधील रामनाथपूर युनियनच्या माझिपारा भागात रविवारी रात्री हे दुष्कृत्य घडले.

बांगलादेशात 2 मंत्र्यांची 2 वक्तव्ये

असद्दुजमन खान – हिंदूंविरुद्ध हिंसाचारादरम्यान दुर्गा मंडपांवरील हल्ले हा पूर्वनियोजित कट होता, असे विधान बांगलादेशचे गृहमंत्री असद्दुजमन खान यांनी केले आहे. मुराद हसन – माहिती राज्य मंत्री मुराद हसन यांनी, आम्ही वंग बंधू शेख मुजिबूर रहमान यांनी तयार केलेल्या 1972 च्या राज्यघटनेकडे पुन्हा वळू. इस्लाम हा बांगलादेशचा धर्म नाही, असे विधेयक आम्ही आणू, असेही त्यांनी म्हटले आहे.

आगी लावणारे लोक हे 'जमात-ए-इस्लामी' आणि या संघटनेच्याच 'इस्लामी छात्र शिबीर' या विद्यार्थी शाखेचे सदस्य होते.

– मोहम्मद सादिक उल इस्लाम, अध्यक्ष, रामनाथपूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news