बांगला देशात हिंदूंची घरे, मंदिराची कट्टरपंथीयांकडून तोडफोड

बांगला देशात हिंदूंची घरे, मंदिराची कट्टरपंथीयांकडून तोडफोड

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : बांगला देशात शुक्रवारी कट्टरपंथीयांच्या एका गटाने नरेलमधील दिघोलिया गावातील हिंदूंची घरे आणि एका मंदिरावर हल्ला केला. या हिंसाचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक हिंदू मुलीने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट केल्याचा दावा कट्टरपंथीयांनी केला. दिघोलिया गावातील अनेक हिंदूंच्या घरांची कट्टरपंथीयांकडून तोडफोड करण्यात आली. गर्दीला आवरण्यासाठी हवेत गोळीबार केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी बांगलादेशची राजधानी ढाकामधील इस्कॉनच्या राधाकांत मंदिराची 200 कट्टरपंथीयांच्या गटाने तोडफोड केली होती.
2013 ते 2012 पर्यंत बांगला देशातील हिंदूंना टार्गेट करत 3 हजार 600 हल्ले करण्यात आले.

या आठ वर्षांच्या काळात 550 पेक्षा अधिक घरे आणि 440 दुकाने आणि व्यापार्‍यांना कट्टरपंथीयांनी लक्ष्य केले असून हिंदू मंदिरे, मूर्ती, पूजा स्थळांची तोडफोड केल्याची 1 हजार 670 पेक्षा अधिक प्रकरणे झाली असल्याचे मानवाधिकार आयोगाने अहवाल दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news