फ्रान्समधील स्पर्धेत ऐश्वर्याची दमदार सलामी

फ्रान्समधील स्पर्धेत ऐश्वर्याची दमदार सलामी
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : एशियन टेनिस फेडरेशनच्या वतीने ब्लॉईस (फ्रान्स) येथे सुरू असणार्‍या 16 वर्षांखालील मुलींच्या लॉन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरची खेळाडू ऐश्वर्या जाधव हिने पहिले दोन सामने जिंकत दमदार सलामी दिली.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करणार्‍या ऐश्वर्याने फ्रान्सच्या मायलेस मिक्लोविस्की हिचा 6-3, 6-4 असा पराभव केला. दुसर्‍या फेरीत आपल्या कामगिरीत सातत्य राखत ऐश्वर्याने रोमानियाच्या पत्रिसिया लोनान इस्ट्रेटवर 6-3, 7-5 अशा गुणफरकाने विजय मिळविला.

स्पर्धेसाठी जाताना ऐश्वर्याला दिल्ली ते फ्रान्स फ्लाईट होती. फ्लाईटमधील एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडल्याने फ्लाईट मुनीच या विमानतळावर (साडेतीन तास) थांबविण्यात आली होती. यामुळे ऐश्वर्याला ब्लॉईस येथे पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे ती पहिला सामना खेळू शकली नाही. यामुळे तिला खालील 16 गटांत प्रवेश मिळाला. या गटात ऐश्वर्याने चमकदार कामगिरी करीत दोन सामने जिंकून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news