फेसबुकमध्ये मोठा बदल : पोस्ट कुणाला दिसावी हे तुम्हीच ठरवा

Facebook
Facebook
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मेटाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे युजर्सना आपली पोस्ट आणि जाहिरात कुणी पाहावी, यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. या पॉलिसीतील बदलामुळे फेसबुक "पॉवर डेटा" गोळा करणार नाही, असे मेटाने म्हटलेले आहे.

"एखाद्या पोस्टचा ऑडिएन्स कोण असेल, ते ठरवण्याचे अधिकार आता वापरकर्त्यांना असतील. यामुळे तुमच्या फ्रेंडलिस्टमधील कुणाला पोस्ट दिसली पाहिजे, हे तुम्ही ठरवू शकाल. जुन्या सेटिंग्जमध्ये आधी जर पोस्ट पब्लिक केली असेल तर तेच दुसऱ्या पोस्टला लागू होत असे. आता मात्र युजर्सच्या हाती जास्त नियंत्रण असणार आहे," असे फेसबुकने म्हटले आहे.

हे नवीन सेटिंग्ज खालील प्रकारे करता येतील?

– सेटिंग्ज आणि प्रायव्हसी ऑप्शनमध्ये जा.

– तेथून सेटिंग्जवर क्लिक करा

– तेथून अॅक्टिव्हिटी फीडमध्ये जा. तेथे Who Can See Your Future Post असा पर्याय असेल. त्यात एडिटवर क्लिक करा. तुम्ही निवडलेला पर्याय सेव्ह होईल.

फेसबुकवर आपल्या फीडमध्ये कोणत्या जाहिराती दिसाव्यात यात बदल करण्यासाठी Ad Topics and Interest Categories येथून सेटिंग्ज बदलता येतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news