फूड टेक्नॉलॉजी; एक उत्तम करिअर

फूड टेक्नॉलॉजी; एक उत्तम करिअर

Published on

फूड टेक्नॉलॉजी या शास्त्रात पारंगत असणार्‍या व्यक्तीला फूड टेक्नॉलॉजिस्ट असे म्हणतात. नाशवंत अन्नपदार्थ जास्त काळ टिकावेत या द़ृष्टीने त्यावर प्रक्रिया करणे, पण हे करताना अन्नपदार्थामधली पोषक मूलद्रव्ये, गुणवत्ता, रंग-रूप यांचेही जतन करणे ही तारेवरची कसरत कुशलतेने पार पडणार्‍या फूड टेक्नोलॉजिस्टचं व्यावसायिक क्षेत्र आज खूपच विस्तारलेले आहे. शेतात तयार होणार्‍या भाज्या, फळे व अन्नधान्य इत्यादींवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांचे आर्थिक मूल्य वाढवणे हे फूड टेक्नोलॉजीनेच शक्य झाले आहे. कृषी मालावर प्रक्रिया करणारा उद्योग, हा भविष्यात झपाट्याने वाढणारा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा असेल.

फूड टेक्नॉलॉजी

फूड टेक्नॉलॉजी हे कुकिंग अभ्यासक्रम किंवा हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम नसून सायन्स, इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी यांचे सर्वोत्तम मिश्रण आहे. फूड टेक्नोलॉजीमध्ये फूड इंजिनिअरिंग, फूड केमिस्ट्री, फूड प्रोसेसिंग, फूड प्रिझर्व्हेशन, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड पॅकेजिंग, ह्यूमन न्यूट्रिशन, फूड क्वालिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंट, मार्केटिंग व उद्योजकता विकास इत्यादी सर्वात महत्त्वाचे भाग आहेत.

फूड इंजिनिअरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे हीट ट्रान्सफर, फ्लूइड मेकॅनिक्स, बायोकेमिकल इंजिनिअरिंग, प्रोसेस इन्स्ट्रूमेंटेशन डायनॅमिक्स अँड कंट्रोल, प्रोसेस इक्विपमेंट डिझाईन अँड ड्रॉईंग असे जवळजवळ सर्व महत्त्वाचे विषय घेतले जातात. तसेच फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, शुगर अँड कन्फेक्शनरी टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी ऑफ सिरियल अँड बेकरी प्रॉडक्टस्, मीट-पोल्ट्री अँड फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी व ऑइलसीड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यांसारखे विविध विषय फूड टेक्नॉलॉजीमध्ये घेतले जातात.

फूड केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक अन्नामधील कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे व क्षार / खनिजे अशा विविध घटकांचे महत्त्व व त्यांची दैनंदिन गरज तसेच विविध रासायनिक अभिक्रियेतील त्यांचे स्थान याबद्दल माहिती. तसेच फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये हानिकारक मायक्रो ऑर्गानिस्ममुळे होणारी अन्न विषबाधा, त्यांच्यापासून अन्नपदार्थांचे संरक्षण कसे करायचे तसेच चांगल्या मायक्रो ऑर्गानिस्मचा फूड उत्पादनासाठी कसा वापर करायचा हे सांगितले जाते. फूड बायोकेमिस्ट्री मध्ये अन्नघटकांच्या आधुनिक रसायन आणि जैवरासायनिक विश्लेषणात्मक पद्धतींचा वापर कसा करायचा ते सांगितले जाते.

फूड पॅकेजिंगमध्ये नैसर्गिक तसेच कृत्रिम गोष्टीचा वापर करून अन्नपदार्थ जास्त काळ कसे टिकवायचे तसेच ग्राहकाला कसे पॅकेजिंगचा वापर करून आकर्षित करायचे यासंदर्भात माहिती दिली जाते. ह्यूमन न्यूट्रिशनमध्ये लहान मुले, किशोरवयीन मुले, तरुण, वयोवृद्ध माणसे, गरोदर स्त्रिया आणि क्रीडापटू यांची गरज व त्यांचे आजार लक्षात घेऊन विविध घटकांचा वापर करून त्यांच्या गरजेनुसार कोणते व कसे अन्नपदार्थ बनवायचे ते शिकवले जाते. फूड क्वालिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षा हमीसाठी कोणकोणते संयोजन करायला पाहिजे ते शिकवले जाते. यात उद्योजकता विकास अभ्यासक्रमाचा समावेश केलेला असतो.

हे कोर्सेस उपलब्ध असणार्‍या काही इन्स्टिट्यूटस् खालीलप्रमाणे :

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (युडीसीटी) मुंबई विद्यापीठ, मुंबई.

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (एलआयटी), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news