फिफा वर्ल्डकप 2022 कतार : ग्रुप ‘डी’ गतविजेता फ्रान्स हॉट फेव्हरेट

फिफा वर्ल्डकप 2022 कतार : ग्रुप ‘डी’ गतविजेता फ्रान्स हॉट फेव्हरेट
Published on
Updated on

वेध विश्वचषकाचे, प्रा. डॉ. श्रीनिवास पाटील : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेतील चौथा गट म्हणजेच ग्रुप मडीफ मध्ये फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि ट्युनिशिया या चार संघांचा समावेश आहे. यातील फ्रान्स आणि डेन्मार्क हे संघ तुल्यबळ आहेत त्यामुळे ते बाद फेरीसाठी पात्र ठरतील यात शंका नाही.

1. फ्रान्स :

जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला हा गतविजेता संघ स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणून गणला जातो. गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत या वर्षीचा संघ तितका बलाढ्य नसला तरी संघात प्रतिभेची कमतरता नाही. पण इंगोलो कांटे, पॉल पोग्बा यासारख्या अनुभवी आणि दर्जेदार खेळाडूंची कमतरता या संघास नक्कीच जाणवेल.

बलस्थान : या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे एखादा खेळाडू जायबंदी झाला तरी त्याच्या जागेवर त्याच गुणवत्तेचा खेळाडू उपलब्ध आहे. त्यामुळे संघ निवड करताना प्रशिक्षकांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील. करीम बेंझेमा, एंबाप्पे यांच्यामुळे आक्रमणाच्या बाबतीत हा संघ अतिशय तुल्यबळ आहे.

कच्चे दुवे : इंगोलो कांटे आणि पॉल पोग्बा यांच्यासारखे अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नक्कीच जाणवेल. 2018 च्या तुलनेत हा संघ अधिक युवा असला तरी कमी अनुभवाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कामगिरीचा अंदाज : एकंदर या स्पर्धेसाठीची संघ बांधणी बघितल्यास हा संघ उपांत्य फेरीत पोहोचण्यास काहीच अडचण नाही.

प्रशिक्षक : डीडीयर डेसचॅम्प्स

2. डेन्मार्क :

जागतिक क्रमवारी 10 व्या क्रमांकावर असलेला हा संघ अतिशय चिवट संघ म्हणून ओळखला जातो. कोणत्याही बलाढ्य संघाला धक्का देण्याची क्षमता या संघामध्ये आहे. संघाची कामगिरी उंचावण्याकरिता खेळाडूंकडून सामूहिक प्रयत्न होतात. त्यामुळे हा संघ या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवू शकतो. त्यामुळेच या संघाला स्पर्धेतील 'अंडरडॉग्स' म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बलस्थान : या संघातील खेळाडूंमध्ये सांघिक भावना उच्च दर्जाची आहे त्यामुळे ते कोणत्याही बलाढ्य संघास चकित करू शकतात. खेळाडूंची संघटित शक्तीमुळे प्रशिक्षकांनी तयार केलेला मॅच प्लॅन यशस्वीपणे अमलात आणण्यास कोणत्याही अडचणी येत नाही.

कच्चे दुवे : हा संघ जरी आक्रमक फुटबॉल खेळत असला तरी संघात दर्जेदार सेंटर फॉरवर्ड ची कमतरता जाणवते. संघातील काही महत्त्वाचे खेळाडू त्यांच्या सध्याच्या फॉर्ममुळे क्षमतेनुसार खेळ करण्यास कमी पडत आहेत.

कामगिरीचा अंदाज : हा संघ बाद फेरीसाठी नक्कीच पात्र ठरेल. या स्पर्धेतील 'अंडर डॉग्स' म्हणून ओळखला जाणारा हा संघ कोणत्याही दर्जेदार संघाविरुद्ध धक्कादायक निकाल नोंदवू शकतो.

प्रशिक्षक : कॅस्पर हजुलमंड

3. ऑस्ट्रेलिया :

जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावर असलेल्या या संघाकडून या स्पर्धेत फारशा अपेक्षा नाहीत. या संघाची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी तितकी चांगली नसली तरीसुद्धा हा संघ 2006 पासून प्रत्येक विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

बलस्थान : मध्य फळीत चार खेळाडू खेळत असल्यामुळे आणि एक बचावत्मक मिडफिल्डर खेळत असल्यामुळे हा संघ हाय प्रेसिंग खेळ करतो. खेळाडूंना हाय प्रेसिंगमध्ये एखादी संधी मिळाली तर काऊंटर अटॅकद्वारे गोल करण्याचा प्रयत्न करतात. या संघातील खेळाडूंमध्ये संघभावना अतिशय चांगली आहे.

कच्चे दुवे : एकाच आक्रमक खेळाडूवर खेळत असल्यामुळे आक्रमणाची धार कमी आहे. तसेच फ्र ान्स आणि डेन्मार्क सारख्या बलाढ्य संघांबरोबर खेळण्याचा अनुभव संघाकडे नाही. हा संघ बॉलवर अधिक काळ नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरतो.

कामगिरीचा अंदाज : या संघास बाद फेरीत पोहोचण्याची कमी संधी असली तरी एखाद्या धक्कादायक निकालाद्वारे ते संपूर्ण स्पर्धेचे चित्र बदलू शकतात.

प्रशिक्षक : ग्रँहम अर्नोल्ड

4. ट्युनिशिया :

जागतिक क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर असलेला हा आफ्रि कन संघ इतका तुल्यबळ नाही. या विश्वचषक पात्रता फेरीमध्ये नशिबाने साथ दिली नसती तर हा संघ कदाचित विश्वचषकासाठी पात्र ठरला नसता. या संघाची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी चांगली नसली तरी आफ्रि कन देशांच्या स्पर्धेमध्ये या संघाने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे.

बलस्थान : या संघातील खेळाडूंमध्ये कोणत्याही संघाबरोबर लढण्याची वृत्ती अतिशय तीव— आहे. संघातील खेळाडूंमध्ये संघभावना अतिशय चांगली असल्यामुळे ते कोणत्याही संघास चकित करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे कदाचित या गटातील 'अंडर डॉग्स' ठरण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

कच्चे दुवे : या संघाकडे दर्जेदार ट्रायकरची कमतरता आहे. संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंचे वय 30 पेक्षा जास्त असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा ठेवता येत नाही.

कामगिरीचा अंदाज : कागदावर जरी हा संघ बलाढ्य नसला तरी धक्कादायक निकाल लावू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष मॅच दिवशी ते कशी कामगिरी करतात यावर त्यांची पुढील वाटचाल ठरणार आहे.

प्रशिक्षक : जलेल कादरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news