पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी

पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात आहेत. देशातील पेट्रोलियम कंपन्याही आता तोट्यातून सावरलेल्या आहेत. तूट भरून निघाल्यात जमा आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करायला हवेत, अशी सूचना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी रविवारी केली. वाराणसीतील गंगा घाटावर आयोजित सीएनजी बोट सभेत ते बोलत होते.

काही राज्यांनी व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी केलेला नाही, त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढलेले असतानाही केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये अबकारी कर कमी करून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ग्राहकांना दिलासा देण्याचे काम केले होते, पण दुर्दैवाने काही राज्यांतील सरकारांनी व्हॅट आजवर कमी केलेला नाही. त्यामुळेच या राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर आजही अन्य राज्यांच्या तुलनेत चढे आहेत.

कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील 9 राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असल्याची चर्चा सुरू झालेली असताना पेट्रोलियम मंत्र्यांनी वरीलप्रमाणे सूचना केल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news