पृथ्वीवर कसे आणले जाईल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक?

पृथ्वीवर कसे आणले जाईल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक?

कॅलिफोर्निया : रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असतानाच चीन व तैवान यांच्यातील तणावाने तिसर्‍या महायुद्धाचे ढग जगावर जमू लागले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या स्थितीचा परिणाम 'पृथ्वीचा डोळा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून 2024 पर्यंत पूर्णपणे माघार घेत असल्याची घोषणा रशियाने केले आहे. 'नासा'च्या मते हे स्थानक 2030 पर्यंत कार्यरत राहू शकते. मात्र, त्यानंतर विशालकाय स्थानक पृथ्वीवर आणले जाऊ शकते का? तसे झाल्यास ते कसे आणले जाऊ शकते, असे प्रश्न उपस्थित होतात. तसे पाहिल्यास हे काही अशक्य काम नाही; पण आहे त्या स्थितीत आणावयाचे झाल्यास पृथ्वीवर आणताना अंतराळ स्थानक एक वितळलेल्या धातूच्या पिंडाचा गोळा झालेले असेल, तसेच त्याचा बहुतेक भाग निकामी झालेला असेल.

अवकाशात प्रचंड वेगाने फिरत असलेले अंतराळ स्थानक फुटबॉल मैदानाइतके मोठे आहे. पृथ्वीपासून सुमारे 350 किमी अंतरावर ते फिरत आहे. याचे सर्व भाग 'नासा'च्या स्पेस शटलने तब्बल 37 खेपा मारून अवकाशात पोहोचविले होते. या अंतराळ स्थानकात काम करणारे शास्त्रज्ञ खास प्रकारच्या कॅप्सूलचा वापर करून पृथ्वीवर येत असतात. असे कॅप्सूल लहान असल्याने केवळ तीनच प्रवासी यामध्ये बसू शकतात.

अशा पद्धतीने अंतराळ स्थानकाला पृथ्वीवर आणावयाचे झाल्यास त्याला लहान लहान तुकड्यांमध्ये लागेल. मात्र, असे करत असताना अंतराळ स्थानकाचे काही भाग कार्यरत असतील व काही भाग पृथ्वीवर पोहोचतील. मात्र, शेवटच्या क्षणी शास्त्रज्ञ याबाबत कोणते पाऊल उचलतात, ते पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news