पुष्करसिंह धामी यांच्या विजयाचा अन्वयार्थ

पुष्करसिंह धामी यांच्या विजयाचा अन्वयार्थ

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तथापि, पोटनिवडणुकीत त्यांनी 93 टक्के मते मिळवत मोठा विजय मिळवला आहे.

चंपावत पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. जनभावनेचा सन्मान करणार्‍या लोकनेत्याला सन्मान मिळतोच. लोकनेत्याची जनमानसाप्रती असलेल्या प्रेमाची परतफेड प्रेमातूनच होते हे मुख्यमंत्री धामी यांच्या विजयातून दिसून येते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर एक वर्षाहूनही कमी कालावधीतच धामी यांनी कार्यकुशल नेतृत्व सिद्ध केले आहे.

राज्याची जनता, प्रसारमाध्यमे, भाजप कार्यकर्ते तसेच इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. याच कार्याच्या आधारावर चंपावत पोटनिवडणुकीत विजयश्री संपादन करताना एकूण मतांपैकी 93 टक्के इतकी प्रचंड मते त्यांना मिळाली. लोकनेत्याचा हा विजय म्हणजे खर्‍या अर्थाने जनतेचा विजय आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्री धामी यांच्या विक्रमी विजयासाठी देशाचे व्हिजनरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद देखील कारणीभूत ठरले आहेत.

उत्तराखंडबद्दल पंतप्रधान मोदी यांना असलेली विशेष आपुलकी, राज्याच्या समग्र विकास योजनांना वेगाने कार्यान्वित करण्यासाठी पंतप्रधानांचे लाभलेले मार्गदर्शन, तसेच राज्यातील जनतेचा पंतप्रधानांच्या नेतृत्वावर असलेला अतूट विश्‍वास महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री धामी यांच्या नेतृत्व क्षमतेवर पंतप्रधान मोदी यांनी दाखविलेला अढळ विश्‍वास या विजयाने सार्थ ठरला आहे.

अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री धामी हे राज्यातील जनता व प्रशासन यांच्यात समन्वयाचा पूल बांधण्यात यशस्वी ठरले आहेत, हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते. सरकारी कर्मचारी तसेच अधिकार्‍यांच्या जनहितांना मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री धामी यांचे नेतृत्व शांत स्वभावाचे असले, तीर कटाक्षाने निर्णयांचा अंमल हे त्यांचे कार्यसूत्र जनतेच्या मनात घर आहे. थेट जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करीत विकास गतिमान करण्याची त्यांची शैली निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रस्त्यावर बाईक चालवताना दिसून आली. छोट्या-मोठ्यांसह प्रत्येकांच्या मनात मुख्यमंत्री धामी यांनी एक सकारात्मक विश्‍वास निर्माण केला आहे.

मुख्यमंत्री धामी यांच्या समोर संपूर्ण निवडणुकीदरम्यान विरोधी पक्ष कुठेच दिसून आला नाही. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आपला पराजय स्वीकारल्याचे दिसून आले. ही निवडणूक पक्षाने नाही, तर मी लढवली आहे, असे काँग्रेस उमेदवाराचे वक्‍तव्य विरोधकांच्या मनातील पराभवाच्या धास्तीचे प्रतीक ठरले. पक्षाचे जवळपास सर्वचे मोठे नेते निवडणूक प्रचारापासून अंतर राखून होते.निवडणुकीत काँग्रेसची जवळपास 90 टक्के बूथ ओस पडली होती. अनेक बूथवर काँग्रेसचे निवडणूक प्रतिनिधीदेखील दिसून आले नाहीत.

निवडणुकीदरम्यान भाजपची संघटनात्मक क्षमता तसेच शिस्तबद्ध कार्यकुशलता विशेष चर्चेत होती. राज्यातील प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाची व्याप्ती आहे. पोटनिवडणुकीत बूथ, वार्ड, शक्‍ती केंद्र तसेच मंडलस्तरावर निवडणूक संरचना, समन्वय, कार्यकर्त्यांची सक्रियता, समपर्ण दिसून आले. जणू प्रत्येक कार्यकर्ताच उमेदवार आहे, याची अनुभूती भाजपच्या प्रचार यंत्रणेवरून दिसून येत होती.

पोटनिवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी भाजपचे महामंत्री (संघटन) अजेय कुमार यांच्या हाती असल्याने हे शक्य झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

– अभिमन्यू कुमार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news