पालकसूप : तोंडाला पाणी सुटेल असे चवदार आणि पालकचे पौष्टिक सूप

 चवदार आणि पौष्टिक पालक सूप
चवदार आणि पौष्टिक पालक सूप

पुढारी ऑनलाइन डेस्क : पालकची भाजी अनेकांची आवडती भाजी आहे. पालक पनीर, पालक बटाटा अशा टेस्टी भाज्यांच्या आपण चवीन अस्वाद घेतो. पण, याच पालकपासून अगदी चवदार आणि पौष्टीक असे सूपही बनवता येते. कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, 'क' व 'के' जीवनसत्त्व असलेल्या पालकचे चवदार आणि पौष्टीक पालकसूप बनवण्याची रेसिपीही सुटसुटीत आणि पटकन होणारी आहे.

पालकचे सूप बनवण्यासाठी पालकची ताजी जुडी, १ कांदा, बटर, ३ टोमॅटो, अर्धा कप क्रीम, तिखटपणासाठी मिरे पूड, मीठ असे पदार्थ लागतात. पालक कोवळी असली पाहिजे, याची मात्र काळजी घ्या. ही पालक देठांसह चिरून घ्या. एका पॅनमध्ये बटर टाकून गरम झाल्यानंतर त्यात चिरलेला कांदा परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेली पालक, आणि चिरलेले टोमॅटो घाला.

थोड्या वेळानंतर यात ४ कप पाणी घाला. या मिश्रणाला चांगली उकळी आली पाहिजे. त्यानंतर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या.

सूप किती दाट हवे त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवा. त्यानंतर त्यात मीठ आणि मिरेपूड टाका. यात थोडे बटरही घाला. सर्व्ह करताना यात क्रिम घाला. अगदी काही वेळात चवदार आणि पौष्टीक असे पालकसूप तयार!

पहा व्हिडीओ : लोणच्याची ही रेसिपी एकदा ट्राय कराच…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news