पाडव्यासाठी सराफ बाजार सज्ज; सोने 52 हजार 100, चांदी 59 हजार रू.

पाडव्यासाठी सराफ बाजार सज्ज; सोने 52 हजार 100, चांदी 59 हजार रू.

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी बाजार सज्ज झाला आहे. गुजरीसह शहर व जिल्ह्यातील सुवर्ण पेढ्यांनी विशेष तयारी केली आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सोने दर प्रति 10 ग्रॅम 52 हजार 100 रुपये तर चांदी प्रतिकिलो 59 हजार रुपये होता.

अनेकजण वर्षभर साठविलेली भिशी व बोनस यांची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदी व दागिने खरेदी करतात. यंदा धनत्रयोदशीला सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मागणी सध्या सोने- चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्याचबरोबर देवदेवतांच्या मूर्तींसह इतर दागिन्यांना चांगली मागणी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news