PAK vs SA World Cup 2023 | पाकिस्तानचे द. आफ्रिकेला २७१ धावांचे लक्ष्य

PAK vs SA World Cup 2023 | पाकिस्तानचे द. आफ्रिकेला २७१ धावांचे लक्ष्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :  द. आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 46.4 षटकांत 270 धावांत गुंडाळले. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने 50 धावा केल्या. शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिझवानने 41 धावांचे योगदान दिले. मोहम्मद नवाजने 24, इफ्तिखार अहमदने 21 आणि इमाम उल हकने 12 धावा केल्या. अब्दुल्ला शफीक 9 धावा करून, मोहम्मद वसीम ज्युनियर 7 धावा आणि शाहीन आफ्रिदी 2 धावा करून बाद झाले. हरिस रौफ खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने चार आणि मार्को जॅनसेनने तीन बळी घेतले. गेराल्ड कोएत्झीने दोन आणि लुंगी एनगिडीला एक विकेट घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news