परमबीर सिंग रशियात गेल्याचा संशय

परमबीर सिंग रशियात गेल्याचा संशय
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : परमबीर सिंग हे देशाबाहेर गेल्याचा संशय असून, ते रशियात असल्याची जोरदार चर्चा आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात राज्य सरकारने 'लूकआऊट' नोटीस काढली असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे सिंग आता तपास यंत्रणांना सापडेनासे झाले आहेत. खुद्द तपास यंत्रणांनाच संशय आहे की, ते देश सोडून फरार झाले आहेत. कारण, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयएने) ऑगस्ट महिन्यामध्ये अनेकदा सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी

समन्स बजावले आहे. मात्र, तरीदेखील सिंग चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे नेमके परमबीर सिंग गेले कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी यासंदर्भात म्हणाले, केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्हीदेखील सिंग यांना शोधत आहोत. मी ऐकले आहे की, ते भारताबाहेर गेले आहेत; पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत. दरम्यान, सिंग हे रशियात असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news