पंढरपूर : अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा लैंगिक अत्याचार

बलात्कार
बलात्कार

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : पत्नीचे निधन झाल्यानंतर वडिलांसमवेत राहणार्‍या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवरच जन्मदात्या पित्याने वारंवार बलात्कार केल्याचा धक्‍कादायक प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला. मुलीला दिवस गेल्याचे लक्षात येताच पित्याने मुलीचे समाजातील तरुणाबरोबर लग्‍न लावून दिले. मात्र, लग्‍नानंतर अगोदरच पत्नी गरोदर असल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने तिला पित्याच्या घरी आणून सोडले. संबंधित पीडित मुलीने 27 डिसेंबर रोजी एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम बाप व पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित अल्पवयीन पीडितेच्या आईचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते. ती तिच्या वडिलासोबत रहात आहे. नराधम बापाने तिच्यावर बलात्कार केला. त्याने हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती गप्प राहिली. त्यानंतर बापाने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती मुलगी गरोदर राहिली.

ही बाब बापाच्या लक्षात आल्यानंतर त्याने मुलगी अल्पवयीन असूनही समाजातीलच एका मुलाबरोबर तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पतीनेही अल्पवयीन असूनही तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर तीन-चारवेळा शरीरसंबंध ठेवले. यादरम्यान संबंधित पीडिता आगोदरच गर्भवती असल्याचे लक्षात येताच पतीने पीडितेला तिच्या वडिलाकडे आणून सोडले.

दरम्यान, संबंधित पीडितेला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्रास होत असल्याने प्रसूतीसाठी पंढरपूरच्या एका रुग्णालयात दाखल केले. तिने सोमवारी (दि. 27) हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे आणि घडला प्रकार हॉस्पिटल प्रशासनाने ग्रामीण पोलिसांना कळविला. त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला. या जबाबानुसार ग्रामीण पोलिस ठाण्यात बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बाप व पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला .

या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना बुधवारी (दि. 29) अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने त्यांना 3 जानेवारी 2022 पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. धनंजय जाधव, पोहेकॉ सुभाष शेंडगे, पोहेकॉ रमेश जाधव, पोहेकॉ सुनिल जाधव, पोहेकॉ आनंता शिंदे , पोना अमोल कवले, पोना अमर सुरवसे, अपर्णा माळी हे करीत आहेत.

* गर्भवती असतानाही लावले लग्‍न
* बाळाला जन्म दिल्यानंतर घटना उघड : वडिलासह पतीवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news