न्या. डी. वाय. चंद्रचूड आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ

CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud

नवी दिल्ली : देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. डी. वाय. चंद्रचूड हे बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत हे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. मात्र, गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्याने त्यांना सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात निरोप देण्यात आला होता. लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून केवळ 74 दिवस काम करण्याची संधी मिळाली होती.

कामकाजाच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने 'ईडब्ल्यूएस' आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला होता. चंद्रचूड यांना
सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चंद्रचूड यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. चंद्रचूड यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून 13 मे 2016 रोजी नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी, मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news