लंडन : उत्तर ध्रुवाच्या वर्तुळाजवळ असलेला एक देश म्हणजे नॉर्वे. या देशाची अनेक वेगळी वैशिष्ट्ये आहेत. जगातील सर्वात स्वच्छ हवा असलेला परिसरही याच देशात आहे. या परिसराचे नाव आहे स्वालबार्ड. आर्क्टिक क्षेत्रातील या परिसरातील पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी 'वाय-फाय'वर बंदी आहे.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे चोरांची भीती नसल्यामुळे इमारतींना टाळे लावले जात नाहीत. 'आर्क्टिकचे वाळवंट' म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. आर्क्टिक महासागरात नॉर्वेजियन बेटांच्या समूहावर स्वालबार्डमध्ये 1,824 फूट उंच पर्वत आहेत.
नेहमीच बर्फाची शुभ्र दुलई पांघरलेल्या या भागात हिवाळ्यामध्ये केवळ 45 लोकांना मुक्काम करण्याची परवानगी मिळते. उन्हाळ्यात तेथील लोकसंख्या 150 च्या वर जाते. उत्तर ध्रुवापासून सुमारे 1,231 किलोमीटरवर असलेली ही शेवटची मानवी वस्ती आहे. या भागात वर्षभरात 112 रात्री 24 तास असतात, तर 129 दिवस सूर्य 24 तास तळपत असतो.