महिला वर्ल्ड बॉक्सिंग : निखत झरीन बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’

महिला वर्ल्ड बॉक्सिंग : निखत झरीन बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’
Published on
Updated on

इस्तंबूल : भारताची निखत झरीन 'वर्ल्ड चॅम्पियन' बनली आहे. निखतने थायलंडच्या जितपाँग ज्युत्मासला 5-0 असे नमवून इतिहास घडवला. तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे सुरू असलेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे महिला गटातील एकूण 10 वे सुवर्णपदक ठरले. मागील 14 वर्षांत मेरी कोमनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॉक्सर ठरली आहे.

उपांत्य सामन्यात निखतने जबरदस्त खेळ करत ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला 5-0 असे नामोहरम करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आतापर्यंत सहा वेळची विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे मनीषा मौन (57 किलो) आणि परवीन हुडा (63 किलो) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news