नाशिक : १४ आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नाशिक : १४ आदिवासी विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
Published on
Updated on

नाशिक ; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विकास विभागाच्या मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील आश्रमशाळेतील १४ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.९) उघडकीस आला आहे. बाधित विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने आदिवासी विकास विभागाचे धाबे दणाणले आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर शालेय शिक्षण विभागाप्रमाणेच आदिवासी विभागातर्फे इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्यांला सर्दी तसेच ताप झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्याची अँटिजेंन टेस्ट करण्यात आली होती. त्यात संबंधित विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये तो निगेटिव्ह निघाला. या प्रकरणाची दखल घेत आश्रमशालेतील 394 विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, टेस्टचा अहवाल प्राप्त झाला. त्यात 14 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहे.

दरम्यान, मध्यवर्ती स्वयंपाकगृहात येणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या ३९ शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून भोजन येते. त्यामुळे या शाळेतीलही विद्यार्थ्यांची चाचणी होणार का? याबाबत संभ्रम कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news