नगर : वृध्द दाम्पत्याच्या निघृण खून प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक

नगर : वृध्द दाम्पत्याच्या निघृण खून प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक

कोपरगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील आपेगाव शिवारातील भुजाडे या वृद्ध दाम्पत्याचा खून करून सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा सोने-चांदी मुद्देमाल रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी पोलिसांनी तीन गुन्हेगारांना अटक केली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली.

मुलगा जालिंदर दत्तात्रय भुजाडे संतोषनगर (वाकी) ता. खेड, जि. पुणे यांनी तशी फिर्याद दिली होती. आरोपींमध्ये अजय छंदू काळे (वय 19)  त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय 20) अजय छंदू काळे (वय 22) पढेगाव तालुका कोपरगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५), राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५)  यांच्या घरातून गेला माल ५० हजार, दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तसेच बँकेचे पासबुक चोरून नेले. या घटनेत हे दोघे मयत झाले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडालेली होती

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, नगरचे पोलीस अधीक्षक  मनोज पाटील , यांनी घटना ठिकाणास भेट देऊन , नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीची माहिती प्राप्त करुन शोध घेत असतांना पथकास गुप्तबातमीदारा कडुन माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा अजय काळे याने त्याचे साथीदारासह केला असुन तो कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत आहे.

पथकातील पोनि अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोहेकॉ  दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकों सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ  बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे व चापोना भरत बुधवंत तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोनि. दौलतराव जाधव, सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ  ईरफान शेख , पथकातील अंमलदार यांनी संशयीत इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

कसून चौकशी केल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण, जंतेश छंदु काळे अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.

तिघेही सराईत गुन्हेगार

आरोपी अजय छंदु काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दुखापतीचा ०१ गुन्हा दाखल आहे  आरोपी अमित कागद चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात घरफोडी व दुखापत करणे असे एकुण ०२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी जंतेश छंदु काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द जबरी चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

तीनही आरोपीवर मारामारी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल आहे. सदरची कारवाई ही मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर , अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व  संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगांव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news