कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेला, नव्या जगाची ओळख करून देणारा व गेली सलग तीन वर्षे लोकप्रियतेचे उच्चांक मोडणारा दै. 'पुढारी'चा 'दीपस्तंभ' हा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. या अंकाची पहिली प्रत शुक्रवारी अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाचा दिवाळी अंकही नवी कल्पना घेऊन आला आहे. नेहमीप्रमाणे नामवंत लेखकांचे लेख, कविता, याबरोबरच युवकांना नव्या जगाशी जोडणारा व युवा वर्गाशी मुक्त संवाद साधणार्या लेखांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
गेली तीन वर्षे लोकप्रियतेचे उच्चांक मोडण्याबरोबरच विविध पुरस्कारांनी 'पुढारी'च्या दिवाळी अंकाचा राज्य पातळीवर गौरव करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध संस्था, संघटनांनी 'पुढारी' दिवाळी अंकाला पुरस्कार दिले आहेत.