दै. ‘पुढारी’ टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा आज ग्रामीण लकी ड्रॉ

दै. ‘पुढारी’ टोमॅटो एफएम शॉपिंग उत्सवचा आज ग्रामीण लकी ड्रॉ
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाखो रूपयांची बक्षिसे जिंकून देण्याची संधी असणार्‍या दै. 'पुढारी' टोमॅटो एफएमने आयोजित केलेल्या शॉपिंग उत्सव 2022 योजनेचा ग्रामीण लकी ड्रॉ शुक्रवारी (दि. 9) काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मार्केट यार्डातील वारणा बँकेच्या शाखेत हा कार्यक्रम होईल.

घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या योजनेत सहभागी दुकानांतून खरेदी करणार्‍या ग्राहकांना कुपन दिले जाते. हे कुपन भरल्यानंतर ग्राहकांचा या योजनेत समावेश होतो. योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना लकी ड्रॉ काढून लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. यामध्ये सोने, वॉशिंग मशिन, स्मार्ट फोन, फूड प्रोसेसर, ब्लेंडर, हेड फोन व सरप्राईज गीफ्ट दिली जाणार आहेत. या योजनेसाठी एसएस मोबाईल मुख्य प्रायोजक आहेत. तनिष्क सहयोगी प्रायोजक आहेत. गिरीश सेल्स, वारणा बँक, महेंद्र ज्वेलर्स, स्फूर्ती, चिपडे सराफ व राजाकाका ई-मॉल हे सहप्रायोजक आहेत.

या कार्यक्रमास दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, वारणा बँकेचे चेअरमन निपुन कोरे, व्हा. चेअरमन उत्तम पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सारदळ, सरव्यवस्थापक प्रकाश डोईजड, सहायक सरव्यवस्थापक अमित धोत्रे उपस्थित राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news