देशात रोजगारनिर्मितीचा विक्रम

देशात रोजगारनिर्मितीचा विक्रम

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : केंद्र सरकारकडून रोजगारविषयक आकडेवारी जाहीर करण्यात आली असून 2021-22 या आर्थिक वर्षात संघटित क्षेत्रामध्ये एकूण 1 कोटी 22 लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. एका वर्षात इतक्या मोठ्या संख्येने नोकर्‍या निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ होय.

विशेष म्हणजे भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) 2021-22 या वर्षात 1 कोटी, 22 लाख नवीन रोजगारांची नोंदणी झाली आहे. त्याआधी 2020-21 या वर्षात 77 लाख 10 हजार नोकर्‍या निर्माण झाल्या होत्या. 2019-20 या वर्षात 78 लाख आणि 2018-19 या वर्षात 61 लाख, 10 हजार नोकर्‍यांची निर्मिती झाली होती.

यंदाच्या जानेवारीपासून रोजगार निर्मितीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च 2022 मध्ये देशभरात 15 लाख 30 हजार नवीन नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत त्यात 19.5 टक्के वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात 12 लाख 80 हजार रोजगार निर्माण झाले होते.

ईपीएफमध्ये बंपर नोंदणी

ईपीएफओमध्ये नोंदणी करणार्‍या आस्थापनांची संख्यादेखील वाढली असल्याचे दिसून आले आहे. ईपीएफओमध्येे मार्च महिन्यात 1 लाख, 18 हजार आस्थापनांनी पहिल्यांदाच कर्मचार्‍यांसाठी पीएफचा भरणा केला. फेब्रुवारीत 78 हजार, 133 आस्थापनांनी पीएफची वजावट केली होती. मार्च महिन्यात नोकरी मिळवण्यात 20-25 वयोगटातील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news