दुमजली इमारतीइतकी उंच गाडी!

दुमजली इमारतीइतकी उंच गाडी!

दुबई :  जगातील सर्वात लांब कार म्हणून अमेरिकेतील 'द अमेरिकन ड्रिम' या कारची ओळख आहे. अशा काही लांब किंवा मोठ्या आकाराची वाहने जगाचे लक्ष वेधून घेत असतात. संयुक्त अरब अमिरातचे शेख अहमद बिन हमदान अल नहयान यांच्याकडे जगातील सर्वात उंच गाडी आहे. या गाडीची उंची सुमारे 22 फूट, लांबी 46 फूट आणि रुंदी सहा फूट आहे. एखाद्या दुमजली इमारतीइतकी उंच ही गाडी आहे!

चारचाकी वाहनांच्या सर्वात मोठ्या संग्रहाबाबत शेख यांचे नाव गिनिज बुकमध्ये नोंदवलेले आहे. शेख यांनी या विशेष गाडीची निर्मिती केली आहे. या हमरमध्ये वेगवेगळे इंजिन बसवण्यात आले आहेत. या गाडीत दोन मजले असून, त्यामध्ये स्वयंपाकघर, शयनकक्ष आणि स्वच्छतागृहही आहे. ही गाडी घेऊन ते बाहेर पडले की, रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागते. एखाद्या सामान्य कारच्या तुलनेत ही गाडी तिप्पट आकाराची आहे. या गाडीत अन्यही अनेक सुविधा आहेत व त्या पाहता ही गाडी म्हणजे एक चालतेफिरते दुमजली घरच असल्याचे दिसून येते. 'हौसेला मोल नाही' असे म्हणतात. त्याप्रमाणेच शेख यांनीही कोट्यवधी रुपये खर्च करून ही मोठी गाडी बनवून घेतली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news