दाऊदला भारताकडे सोपवणार काय? पाकचे तोंडावर बोट

दाऊदला भारताकडे सोपवणार काय? पाकचे तोंडावर बोट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इथे सुरू झालेल्या इंटरपोल महासभेत कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईदवरून पाकिस्तानची चांगलीच गोची झाली. या दोघांना भारताच्या हवाली करणार का, असा थेट सवाल पत्रकारांनी करताच पाकिस्तानच्या फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक मोहसीन बट यांनी चक्क तोंडावर बोट ठेवले.

मुंबई बॉम्बस्फोट मालिका घडवून फरार झालेला दाऊद हा पाकिस्तानमध्येच असून आणि सईद हा मुंबईवरील 26/11 च्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आजही पाकमध्ये खुलेआम फिरतो आणि त्याच्या कारवायाही सुरू आहेत. दाऊद कराचीत डिफेंस कॉलनीत राहत असल्याचे उघड असले तरी पाकने कधीही मान्य केले नाही.

इंटरपोल महासभेच्या निमित्ताने भारतीय पत्रकारांची गाठ मोहसीन बट यांच्याशी पडताच दाऊद आणि सईदला भारतीय यंत्रणांच्या हवाली करणार का? असा थेट सवाल करण्यात आला आणि पाकने पुन्हा चुप्पी साधली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news