दहावीचा आज ऑनलाईन निकाल

CBSE Result
CBSE Result

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून, शुक्रवारी (दि.17) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी करायची आहे, त्यांना 20 ते 29 जून या कालावधीत मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती हव्या आहेत, त्यांना 20 जून ते 9 जुलै या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील.

तसेच जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्‍या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 20 जूनपासूनच ऑनलाईन अर्ज करता येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली.

येथे पाहा निकाल

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news