नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या दिवशी नवदुर्गा दर्शनासाठी कोल्हापुरात गर्दी

दर्शनासाठी गर्दी
दर्शनासाठी गर्दी
Published on
Updated on

नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या दिवशी नवदुर्गा दर्शनासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, सर्वच मंदिरांत देवींच्या आकर्षक व विविध संकल्पनेवर आधारित पूजा बांधण्यात आल्या होत्या.

नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच शनिवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची 'कौमारी मातृका' रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही देवांचा सेनापती अथवा युद्धदेवता कार्तिकेयाची शक्ती आहे. हिला कुमारी, कार्तिकी किंवा अंबिका म्हणूनही ओळखले जाते. कौमारी मोरावर स्वार असून, तिला चार हात असतात. या हातांत भाला, कुर्‍हाड, शक्ती किंवा टाक आणि धनुष्य आहे. ही पूजा श्रीपूजक मयुर मुनिश्वर, सोहम मुनिश्वर, सुकृत मुनिश्वर यांनी बांधली.

तासाला 1 हजार भाविकांना दर्शन

यंदा प्रथमच 'ई-दर्शन पास'ची ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 26 हजार भाविकांनी नोंदणी करून दर्शन घेतले. दरम्यान, देवस्थान समितीने पहिल्या दिवशी प्रत्येक तासाला 700 भाविकांना प्रवेश दिला होता. दुसर्‍या दिवशी यात वाढ करून 900 करण्यात आला. यात पुन्हा वाढ करून 1 हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

'दर्शन वेबासाईट' काही काळ हँग

शनिवारी 'ई-दर्शन पास'च्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली. देशासह जगभरातून भाविकांनी देवस्थानच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगसाठी प्रयत्न केले. एकाचवेळी लाखो लोकांनी नोंदणीसाठी प्रयत्न केल्याने वेबसाईट हँग झाल्याने काही काळ सेवा थांबली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news