त्याच्या लंचबॉक्समध्ये दबा धरून बसला होता विषारी साप

साप
साप

अ‍ॅडलेड : मुले शाळेतून घरी आली की त्यांची आई त्यांचे दप्तर, डबा नेहमीच तपासून पाहतात. कधी डबा संपलेला असतो तर कधी त्या पोळ्या तशाच उरलेल्या. मात्र, या आईला जे दिसले ते सर्वांगाचा थरकाप उडवणारे होते. झाले असे की, ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड शहरातील या आईने जेव्हा आपल्या मुलाचा लंचबॉक्स उघडला तेव्हा तिला झाकणाच्या खाचेत विषारी सापाचे पिल्लू दडून बसल्याचे दिसले. तिने लगेच याची माहिती सर्पमित्र रॉली बर्रेल यांना दिली.

लगेच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या सापाला पकडले. त्या लहानग्याचे सुदैव असे की, नेमका त्याच दिवशी त्याला डबा खायचा कंटाळा आला होता; अन्यथा अनर्थ ओढवला असता. हा तपकिरी रंगाचा साप जगातल्या सर्वाधिक विषारी सापांपैकी एक असल्याचे नंतर स्पष्ट झाले. तुमच्या मुलाने पूर्ण डबा खाल्लाय किंवा नाही, हे पाहण्यासाठी जेव्हा डबा उघडता तेव्हा खरे तर असे काही अपेक्षित नसते. रॉली यांच्या मते विषारी सापाचं पिल्लूदेखील अत्यंत धोकादायक असते. त्या महिलेने वेळीच तो साप पाहिला अन्यथा त्या लहान मुलाला कळालही नसते की या सापाने त्याला चावा घेतला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news