तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही अक्‍कलकोट दुर्लक्षित

तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही अक्‍कलकोट दुर्लक्षित
Published on
Updated on

अक्‍कलकोट : पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र अक्कलकोटला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून 25 वर्षे झाली, मात्र अद्यापही मूलभूत गरजांची वानवा जाणवत आहे. शहरवासीय व स्वामीभक्त यांची सांगड घालून विकास करणे शक्य असतानाही असे न झाल्याने राज्यातील टॉप फाईव्हमधील असणारी श्री स्वामी समर्थनगरी ही विविध सोयींपासून दुर्लक्षित आहे. सीसीटीव्हीसारख्या अत्याधुनिक यंत्रणेची सुविधा उत्तर पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली आहे.

तीर्थक्षेत्रात शहराचे वाढते नागरिकीकरण, वाढत चाललेली स्वामी भक्तांची गर्दी पाहता तत्कालीन पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी शहरभरात लोकसहभागातून 46 कॅमेरे बसविले होते. याबरोबरच एकेरी वाहतूक, नो पार्किंग, रोड रोमिओ, तळीराम यांचा बंदोबस्त करण्याकामी कॅमेर्‍याबरोबरच विविध ठिकाणी उद्घोषणाद्वारे (स्पिकर्स) लोकांना जागृत करण्यासाठी यंत्रणा सुरू केलेली होती. मात्र, पोलिस निरीक्षक बंडगर यांच्या बदलीनंतर या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले व शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले कॅमेरे स्पिकर्स चोरीला गेले. त्यानंतर येणार्‍या अधिकार्‍यांनी काही प्रमाणात सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र पूर्वीप्रमाणे यश मिळाले नाही. कालांतराने अधिकार्‍यांच्या बदल्या होत गेल्या अन् ही यंत्रणा खिळखिळी झाली. मात्र पोनि जितेंद्र कोळी यांनी सीसीटीव्हीसारखी यंत्रणा आवश्यकच असून याकरिता ही यंत्रणा सुरू होण्याकामी प्रयत्न करण्यात आले.

46 पैकी येत्या काही दिवसांत 22 कॅमेरे कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक, विजय चौक महषीर्र् वाल्मिकी मार्ग, ए-वन चौक, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, कारंजा चौक, मेन रोड कापड लाईन, वीर सावरकर चौक, राजेफत्तेसिंह चौक अशा ठिकाणचे कॅमेरे सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित 24 सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लवकरच कार्यान्वित होणार आहेत. अनेक ठिकाणचे कॅमेरे हे चोरीला गेले असून या अडचणी दूर करून लवकरच कायान्वित करण्यात येणार आहेत.

याअगोदरदेखील अक्कलकोट नगरपरिषदेने सीसीटीव्ही यंत्रणेकरिता निधी दिला होता. आतादेखील देऊ, मात्र त्याची निगा, देखभाल दुरुस्ती व संरक्षण होणे गरजेचे आहे. याबाबत गृह विभागाने दक्ष राहून कार्यरत राहिल्यास शहरातील सध्या कार्यान्वित करण्यात येणार्‍या 22 सीसीटीव्हींसह उर्वरित 24 याबरोबरच आणखी काही नवीन कॅमेरा बसविणेकामी न.प.चे सहकार्य असेल.
– सचिन पाटील, प्रशासक, मुख्याधिकारी, अक्कलकोट नगरपरिषद

सीसीटीव्हीची यंत्रणा आणखी वाढविण्यावर भर असणार आहे. उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सीसीटीव्ही यंत्रणा लोकसभागातून बसविण्याकामी प्रयत्नशील राहू.
– जितेंद्र कोळी, पोलिस निरीक्षक, उत्तर पोलिस ठाणे, अक्कलकोट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news