मुंबई : संजय ग्रोव्हर गेल्या अनेक वर्षांपासून हॉलीवूड स्टुडिओ एमजीएम लॉस एंजिल्समध्ये निर्माता, कार्यकारी आणि निदेशक म्हणून अनेक योजनांवर काम करत आहेत. दरम्यान, टी-सीरिज कंपनीने हॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. जगभरातील चाहत्यांसाठी हॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक तरसेम संजय ग्रोव्हर यांचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.
तरसेम यांनी 'द सेल', 'द फॉल', 'इमोर्टल्स', 'मिरर मिरर', 'सेल्फलेस' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून ज्युलिया रॉबर्टस्, जेनिफर लोपेज, बेन किंग्जले, मिकी राउरके, फरिदा पिंटो, हेनरी कॅविल, रेऑन रेनॉल्डस यासारख्या कलाकार समवेत काम केले आहे. तरसेम यांनी ब्रँड पीट, लेडी गागा, डीप फॉरेस्ट, अनरिक इग्लेसिअस यासारख्या कलाकारांसमवेत अनेक जाहिराती आणि संगीत व्हिडीओ तयार केले आहेत. संजय ग्रोव्हर चित्रपट 'डिअर जस्सी' या चित्रपटासाठी तरसेम यांच्याबरोबर काम करत आहेत.
नुकतेच त्यांनी टी-सीरिज आणि वकाऊ फिल्मचे भूषण कुमार यांच्याशी संपर्क साधला आहे. भुषणकुमार आणि वकाऊच्या चित्रपटांची माहिती दिली त्यावेळी तरसेम यांनी टी-सीरिजसाठी हॉलीवूडपट तयार करण्याची तयारी दर्शवली असल्याचे ग्रोव्हर यांनी सांगितले.