जीवसृष्टी : शुक्राच्या ढगांमध्ये जीवसृष्टीला अनुकूल संकेत

जीवसृष्टी : शुक्राच्या ढगांमध्ये जीवसृष्टीला अनुकूल संकेत
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः पृथ्वीच्या शेजारच्या शुक्र ग्रहावर इतकी खडतर स्थिती आहे की तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व निर्माण होणे शक्यच नाही असे मानले जाते. कार्बन डायऑक्साईडचे घनदाट वातावरण आणि शिशालाही वितळवू शकणारी उष्णता असलेल्या या ग्रहावर जीवसृष्टीसाठी अत्यंत प्रतिकूल स्थिती आहे. मात्र, तरीही संशोधकांना शुक्राच्या ढगांमध्ये जीवसृष्टी साठी अनुकूल संकेत मिळाले आहेत. संशोधकांना वाटते की एका रासायनिक प्रक्रियेनंतर शुक्राच्या ढगांना जीवांसाठी अनुकूल बनवले जाऊ शकते. अशा प्रक्रियेमुळे शुक्राच्या आम्लयूक्‍त वातावरणाला निष्प्रभ करता येईल.

सुमारे 50 वर्षांपासून संशोधक शुक्राच्या वातावरणात अमोनियाच्या उपस्थितीने चकीत आहेत. नायट्रोजन आणि हायड्रोजनपासून बनलेला हा एक रंगहीन वायू आहे. 1970 च्या दशकात शुक्राच्या वातावरणामध्ये त्याचा अस्थायी रूपाने शोध लावण्यात आला होता. वैज्ञानिकांचा दावा आहे की अत्यंत खडतर स्थिती असलेल्या या ग्रहावर कोणत्याही ज्ञात रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून अमोनिया उत्पन्‍न केला जाऊ शकत नाही. कार्डिफ युनिव्हर्सिटी, एमआयटी आणि केम्बि—ज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शुक्र ग्रहाच्या रासायनिक प्रक्रियांबाबत संशोधन केले. त्यांनी शुक्राचे वातावरण समजून घेण्यासाठी एक मॉडेलही तयार केले. त्यानंतर त्यांनी दावा केला की शुक्रावर अमोनियाचे अस्तित्व आहे तर तो रासायनिक प्रक्रियांची एक अशी मालिका सुरू करेल जी सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या आसपासच्या थेंबांना निष्प्रभ करून टाकेल. जर असे झाले तर त्याच्या परिणामस्वरूप ढगांमधील आम्लता 11 पासून शून्यावर येईल. काही संशोधकांना वाटते की तेथील अमोनियाच्या अस्तित्वाला जैविक उत्पत्तीचे कारण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news