जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण

जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना कोरोनाची लागण
Published on
Updated on

पुणे: पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना आज कोरोनाची लागण झाली आहे. मागील दोन वर्षापासून सुट्टी न घेता कार्यरत असणाऱ्या जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना अखेर कोरोनाने गाठले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील देशमुख रस्त्यावर उतरून कोरोना रुग्णांच्या सेवा करत होते. त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले होते.

मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका सुरू होत्या. पवार यांना देखील कोरोना झाला आहे. त्यांच्या पाठोपाठ पुण्याची जिल्हाधिकारी देशमुख यांना देखील कोरोनाने गाठले आहे. डॉक्टरांच्या अधिपत्याखाली जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news