लुधियाना वृत्तसंस्था : पंजाबमधील जालंधर येथील बिटला या गावातील सासरवाडीत येऊन एकाने दारूच्या नशेत पत्नी, मुलगा, मुलगी, सासू आणि सासर्यांना जिवंत जाळले. खुरशैदपुरा येथील काली सिंह याने पत्नी माहेरी आल्याच्या रागातून हे सर्व जण झोपेत असताना घरात पेट्रोल ओतले व बाहेरून कुलूप लावून आग लावली. कुणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. मृत बालकांचे वय अनुक्रमे 5 व 7 आहे.
काली सिंहच्या व्यसनाला कंटाळून पत्नी परमजीत कौर वडील सुरजन सिंग यांच्याकडे मुलांसह माहेरी आली होती. मुलगी अर्शदीप कौर, मुलगा गुरमोहल सिंह, सासू जोगिंदर कौर अशी अन्य मृतांची नावे आहेत.