जागा काढून घ्यायला मी महाडिक नाही – ना. सतेज पाटील

जागा काढून घ्यायला मी महाडिक नाही – ना. सतेज पाटील

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत माझ्याबद्दल जागा काढून घेईल, असा अपप्रचार विरोधकांनी केला होता. जागा काढून घ्यायला मी काय महाडिक नाही, असे सांगून पालकमंत्री सतेज पाटील यांनी, कपूर वसाहतीमध्ये राहणार्‍या नागरिकांची घरे लवकरच नावावर होतील, अशी ग्वाही मंगळवारी दिली. कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीतील विजयानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने कदमवाडी येथील विठ्ठल चौकात आयोजित केलेल्या सभेत पाटील बोलत होते.

'खटक्यावर बॉट, जागेवर पलटी'  – ना. सतेज पाटील

तुमचं काय करायचे हे लोकांनी या निवडणुकीत ठरवलं होतं. तुमचं गाव तुमच्या पाठीशी नाही. 'खटक्यावर बॉट, जागेवर पलटी' अशी तुमची अवस्था तुम्ही राहता त्या ठिकाणच्या लोकांनी केली आहे. आता तुम्ही बाहेर कोणत्?या तोंडाने मते मागणार. आता त्यांनी आत्मचिंतन करावे. कदमवाडी, भोसलेवाडी परिसरात गुंडगिरी, दादागिरी करणार्‍यांना भीक घालू नका, असा टोला पाटील यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला. कदमवाडी परिसरातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे या परिसराच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. विकास कांमाना निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीतही असेच महाविकास पाठीशी रहावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.

उत्तरच्या पोटनिवडणुकीला जातीय रंग देणार्‍यांचा चेहरा उघड

थेट पाईपलाईनचे पाणी येत्या दिवाळीपर्यंत निश्‍चित येईल, याचा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. निवडणुकीला जातीय रंग देणार्‍या भाजपचा खरा चेहरा उघड करण्याचे काम कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण तयार रहावे, असेही ते म्हणाले. माजी आ. मालोजीराजे यांनी, राजकारणासाठी धर्माचा वापर करणार्‍या मंडळींना पोटनिवडणुकीत रोखण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केल्याचे सांगितले. यावेळी आ. जयश्री जाधव, भीमराव पोवार, राजेश लाटकर, भारती पोवार, दीपक पाटील यांचीही भाषणे झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news