जगातील सर्वात मोठा जीवाणू!

जगातील सर्वात मोठा जीवाणू!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : संशोधकांनी जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या जीवाणूचा शोध लावला आहे. त्याची लांबी 0.4 इंच आहे. 'थियोमार्गारिटा मॅग्निफिका' नावाच्या प्रजातीचा हा जीवाणू ग्वाडेलोपमधील एका दलदलीच्या पाण्यातील वनस्पतीच्या पानावर आढळला. विशेष म्हणजे हा जीवाणू पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज नाही, उघड्या डोळ्यांनीही त्याला पाहता येऊ शकते. सफेद रंगाच्या शेवईसारखे त्याचे रूपडे आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म सल्फर ग्रॅन्युल्स असतात, त्यामुळे ते मोत्यासारखे चमकते.

हा जीवाणू सामान्य जीवाणूंच्या तुलनेत हजारो पटीने अधिक मोठा आहे. त्यामुळे त्याला सहजपणे पाहता येऊ शकते. जीवाणू केवळ सूक्ष्मदर्शकानेच पाहता येतात या धारणेला छेद देणारा हा जीवाणू आहे. कॅलिफोर्नियातील समुद्री जीववैज्ञानिक जीन-मेरी वोलँड यांनी सांगितले की, हा जीवाणू सामान्य जीवाणूच्या तुलनेत सुमारे पाच हजार पटीने अधिक मोठा आहे. एखादा माणूस एव्हरेस्ट पर्वतशिखराइतका उंच असल्यासारखाच हा प्रकार आहे. मँग्रोव ईकोसिस्टीमच्या तळात हा जीवाणू वाढतो. वनस्पतींमधील प्रकाश संश्‍लेषण क्रियेसारखीच त्याच्यामध्ये रसायन संश्‍लेषणाची क्रिया होते. खरे तर त्याचा शोध 2009 मध्ये फ्रेंच अँटिल्स विद्यापीठातील ऑलिव्हर ग्रोस यांनी लावला होता. मात्र, त्याचा आकार पाहता ही एक बुरशी असावी असे त्यांना वाटल्याने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news