छत्रपती संभाजीनगर : विवाहितेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

file photo
file photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका (३० वर्षीय) विवाहित महिलेची डोके दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. चिकलठाणा विमानतळाजवळील जुना बायपास परिसरात (रविवार) संध्याकाळी १० वाजता ही घटना समोर आली. नीता संतोष जोंधळे (वय 32 वर्षे), असे मृत महिलेचे नाव आहे.

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीता या कुटुंबीयांसह येथे राहात होत्या. त्यांचे पती खासगी काम करतात. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, काही दिवसांपासून त्या परिसरातील चर्चमध्ये जात होत्या. रविवारी सायंकाळी देखील त्या चर्चमध्ये गेल्या होत्या. मात्र, तेथील प्रार्थना पूर्ण झालेली नसताना दुपारी 1 वाजता त्या बाहेर पडल्या. पण, त्या घरीही पोचल्या नव्हत्या. सायंकाळी पाच वाजता विमानतळ परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसी सिडकोचे गौतम पातारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह घाटीत हलविला. मारेकऱ्यांनी दगडाने डोके ठेचून नीता यांची हत्या केल्याचे प्राथमिक अंदाजवरून दिसते. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक आत्माराम घुगे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news