चीनच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोक कोरोनाबाधित

चीनच्या हेनान प्रांतातील 90 टक्के लोक कोरोनाबाधित
Published on
Updated on

बीजिंग; वृत्तसंस्था :  चीनच्या हेनान या तिसर्‍या सर्वात मोठ्या प्रांतातील 90 टक्के लोक कोरोनाने बाधित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रांतातील 8 कोटी 80 लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका आरोग्य अधिकार्‍याने पत्रकार परिषद घेउन सांगितली.

लोकसंख्येच्या बाबतीत चीनमध्ये हेनान प्रांत तिसर्‍या क्रमांकाचा प्रांत आहे. कोरोनाच्या सध्याच्या लाटेत या प्रांताला भीषण तडाखा बसला असून येथील आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. बाधितांचा आकडा भयावह वाटण्याएवढा वाढला आहे. या प्रांताचे आरोग्य अधिकारी कान क्वानचेंग यांनी चक्क एका पत्रकार परिषदेत प्रांतातील 8 कोटी80 लाख लोक कोरोना बाधित असल्याचे सांगितले. ही हेनानची 90 टक्के लोकसंख्या आहे.

कोरोनाची लागण कोणत्या कालावधीत झाली, केव्हापासून वाढली हा तपशील मात्र त्यांनी दिला नाही. फक्त 19 डिसेंबर हा लागण होण्याचा शिखरबिंदू होता, नंतर संख्येत घट होत गेली असे म्हटले आहे. चीन सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत 1 लाख 20 हजार जणांनाच कोरोनाची बाधा झाल्याचे व 30 जण मरण पावल्याचे सांगण्यात आले आहे. पण कान यांच्या पत्रपरिषदेने चीनचा सरकारी दावा फोल असल्याचे दिसते. दुसरीकडे, क्वींगडाओ या शहरात ख्रिसमसच्या आदल्या दिवशी पाच लाख जण बाधित झाल्याचे समोर आले आहे. ही बातमी त्यावेळीही जाहीर करण्यात आली होती. पण काही तासातच ती मागे घेण्यात आली असे बीबीसीच्या बातमीत म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news