बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यात तीन वर्षांपासून बंद असलेल्या सर्व सीमा चीनने आता खुल्या केल्याने भारतासह जपान, थायलंड आणि अमेरिका या देशांमध्येही धोका निर्माण झाला आहे. चीनने रविवारी हाँगकाँगची सीमा खुली केली. मोठ्या संख्येने दोन्ही बाजूंनी प्रवाशांचे दळणवळण झाले. स्थलांतरित लोकांसाठी क्वारंटाईनसारखा मोठा प्रोटोकॉलही चीनकडून रद्द करण्यात आला आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनमधील नव्या नियमावलीअंतर्गत देशात येणाऱ्या प्रवाशांचे स्वॅब नमुने कोरोना प्रकारांच्या निरीक्षणासाठी गोळा केले जातील. जिनोम सिक्वेन्सिंग होईल. शिवाय स्थानिक प्राधिकरणाला सामाजिक मेळाव्यावर बंदी घालण्याची मुभा असेल.
भारतात वर्षभरात ओमायक्रॉनचे ३०० उपप्रकार आढळले आहेत. अर्थात, यापैकी एकही भारतामध्ये मोठा धोका ठरू शकला नाही. कारण, भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे.
– डॉ. एन. के. अरोरा, इंडियन सार्स कोव्ह – २ जेनोमिक्स कन्सोर्टियम, दिल्ली