जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण आहे. पावसाळ्यात निसर्गाचा हा अविष्कार अधिकच खुलून दिसतो. हौशी पर्यटनालाही बहर येतो. प्रत्येक आठवड्यात सुटी दिवशी पाहण्यासारखी कोणती पर्यटन स्थळे आहेत, तेथे काय-काय पाहण्यासारखे आहे. जिल्ह्यात असणार्या विविध पर्यटन स्थळांची माहिती देणारे सदर आजपासून…
सह्याद्रीची डोंगररचना आणि घनदाट अरण्यांची जोड यामुळे एकूणच चांदोली परिसराला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 1985 मध्ये चांदोलीला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. 2010 मध्ये कोयना व चांदोली मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर युनेस्कोनेही त्याचा वारसा यादीत समावेश केला आहे. व्याघ्र प्रकल्पानंतर या अभयारण्यातील वावरावर अनेक बंधने आली असली तरी बफर झोनमध्ये काही ठिकाणी जाता येऊ शकते.