चंदनापेक्षाही महागडे लाकूड! किंमत वाचून थक्क व्हाल…

चंदनापेक्षाही महागडे लाकूड! किंमत वाचून थक्क व्हाल…

लंडन ः काही लाकडे खूपच महाग आणि काही अत्यंत दुर्मीळ असतात. तसे सामान्यत: चंदनाच्या लाकडालाच सर्वात महागडे मानले जाते, परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असे एक लाकूड आहे, जे चंदनाच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त महाग आहे. ते विकत घेण्यापूर्वी सर्वात मोठा श्रीमंत देश देखील नक्कीच दोनदा विचार करेल. 'आफ्रिकन ब्लॅकवूड' असे या लाकडाचे नाव आहे. हे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान साहित्यापैकी एक आहे. या लाकडाची केवळ एक किलोग्रॅम किंमत आठ हजार पौंड म्हणजेच सात लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

इतर झाडांच्या तुलनेत आफ्रि कन ब्लॅकवूड झाड पृथ्वीवर अत्यंत कमी म्हणजेच दुर्मीळ आहे. त्यांची उंची सुमारे 25-40 फूट असते. आफ्रिकन ब्लॅकवूडस् मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील 26 देशांमध्ये आढळतात. ते बहुतेक कोरड्या ठिकाणी आढळतात. जरी या झाडास संपूर्ण वाढण्यास सुमारे 60 वर्षे लागतात, परंतु केनिया आणि टांझानियासारख्या देशांत लाकडांची अवैध तस्करी केल्यामुळे झाडांची अकाली छाटणी केली जाते. यामुळे ब्लॅकवूडची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि ती दुर्मीळ बनली आहेत. आफ्रिकन ब्लॅकवूडच्या लाकडाचा वापर मुख्यतः सनई, बासरी आणि गिटारसारखी वाद्ये तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय या लाकडापासून मजबूत आणि टिकाऊ फर्निचर देखील बनवले जाते; परंतु ते बरेच महाग असतात.

हे ही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news