घटस्फोट : शिखर धवन-आयेशा मुखर्जी का झाले वेगळे?

शिखर धवन-आयेशा यांच्या सुखी संसारात मीठाचा खडा पडला कसा?
शिखर धवन-आयेशा यांच्या सुखी संसारात मीठाचा खडा पडला कसा?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन-आयेशा मुखर्जी यांचा ९ वर्षांनंतर घटस्फोट झाला. आयशा मुखर्जीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अत्यंत भावनिक पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. २०१२ मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. वर्ष २०१४ मध्ये त्यांच्या आनंदी कुटुंबात मुलगा झाला.

आयशाचे वडील बंगाली आणि आई ब्रिटीश…

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांची प्रेमकथा खूप विचित्र आहे आणि तिचा शेवट यासारखा आणखी भयानक आहे. बरं, ते कोण टाळू शकेल. आम्ही तुम्हाला शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत. सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगू की आयेशाचे वडील हे बंगाली आणि आई ब्रिटिश आहे. तिच्या आई-वडीलांची भेटही भारतातच झाली होती. पण पण नंतर ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले.

आयेशाचा जन्म भारतात झाला पण काही दिवसांनी आयेशा ऑस्ट्रेलियाला गेली. तिथच तिचे शिक्षण झाले. अशा प्रकारे तिच्याकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. तिचे मेलबर्नमध्ये घर आहे. आयेशा स्वतःही एक खेळाडू आहे. ती किकबॉक्सर खेळते.

शिखर-आयेशा यांची प्रेमकथा खूप विचित्र आहे. दोघेही फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. पहिल्यांदा शिखर धवनने फेसबुकवर आयेशाचा फोटो पाहिला होता. त्यानंतर त्याने आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघेही फेसबुकवर मित्र झाले आणि प्रकरण इतक्या टोकाला पोहचले की दोघांनीही एकमेकांना हृदय दिले.

हरभजन सिंगची महत्त्वाची भूमिका

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी एकमेकांच्या जवळ येण्यात हरभजन सिंगची मोठी भूमिका आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की भज्जी मध्येच कुठून आला?

वास्तविक शिखर धवनने आयेशाचा फोटो भज्जीच्या फेसबुक अकाऊंटवरच पाहिला होता. त्यानंतर शिखर धवनने आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

२००९ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये आले. यानंतर शिखर धवनने आयेशाला लग्नासाठी प्रपोज केले. आयेशाने होकार दिला.

पण शिखरचे कुटुंबीय या नात्याशी सहमत नव्हते. याचे कारण असे होते की आयशा शिखरापेक्षा १० वर्षांनी मोठी होती. तसेच आयेशा घटस्फोटित आणि दोन मुलींची आई होती. पण शिखरने त्याच्या कुटुंबाला समजवले. अशा परिस्थितीत २०१२ मध्ये शिखर आणि आयशाचे लग्न झाले. दोन वर्षांनंतर दोघांनाही झोरावर नावाचा मुलगा झाला.

लग्नानंतर आयेशाने तिचे आडनाव मुखर्जी बदलून धवन केले. तिचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. या लग्नापासून तिला रिया आणि आलिया नावाच्या दोन मुली होत्या. लग्नानंतर धवनने त्या दोघींना दत्तक घेतले. या दोन्ही मुली ऑस्ट्रेलियामध्ये शिकतात. लग्नानंतर आयेशा आयपीएल सामन्यांमध्ये टीम इंडियासह शिखरला चीअर करताना अनेकवेळा दिसली होती.

लग्नानंतर शिखर धवनने आपल्या आयुष्यातील बदलाचे श्रेय आयेशाला दिले. तो लग्नानंतरच टीम इंडियामध्ये आला आणि नंतर मुख्य खेळाडू बनला. धवनने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो वनडे आणि टी २० मध्ये भारताचा सर्वात मोठा खेळाडू बनला. या यशाचे श्रेय शिखर धवननेही आयेशाला दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news