गोव्यात पट्टेरी वाघानंतर ‘ब्लॅक पँथर’चेही दर्शन

गोव्यात पट्टेरी वाघानंतर ‘ब्लॅक पँथर’चेही दर्शन
Published on
Updated on

पणजी ; विठ्ठल गावडे : गोव्याच्या जैवसंपदेचे भूषण असलेल्या पट्टेरी वाघासोबतच आता जंगलात दुर्मीळ ब्लॅक पँथर (काळा बिबटा) चे दर्शनही गोव्याच्या जंगलात होऊ लागल्यामुळे गोव्याची वनसंपदा किती श्रीमंत आहे याची प्रचिती येते. वन खात्याने म्हादई अभयारण्यासह भगवान महावीर अभयारण्यातही अनेक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. यापूर्वी एकापेक्षा जास्त पट्टेरी वाघ या कॅमेर्‍यात टिपले गेले आहेत. तसेच ब्लॅक पँथरही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

कोयना धरण परिसरात यापूर्वी ब्लॅक पँथर कॅमेर्‍यात कैद झाला होता. काही वर्षांपूर्वी चोर्ला घाट परिसरात म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघासोबतच ब्लॅक पँथरही काही दिवसाच्या अंतराने कॅमेर्‍यात दिसला होता. दि. 7 मे रोजी मध्यरात्रीनंतर भगवान महावीर अभयारण्याच्या परिघात येणार्‍या मोले जंगलात ब्लॅक पँथर वन खात्याच्या कॅमेर्‍यात दिसून आला.

त्यामुळे गोव्यातील जंगलात पट्टेरी वाघ व दुर्मीळ ब्लॅक पँथर यांचा अधिवास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांना वाचवण्याची व त्यांची संपदा वाढवण्यासाठी वन खाते जे प्रयत्न करते त्या प्रयत्नांना लोकांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे.

गोव्यात 5 च्यावर ब्लॅक पँथर असावेत

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, गोव्यातील म्हादई अभयारण्यात वेळोेवेळी ब्लॅक पँथर तथा काळे बिबटे दिसून येतात. अद्याप त्यांची गणती झालेली नाही, तरीसुद्धा पाचच्यावर त्यांची संख्या असू शकते. त्यांच्या संवर्धनासाठी वनक्षेत्रात जी नियमबाह्य शिकार होते ती बंद करणे गरजेचे आहे. कारण, ब्लॅक पँथर वा इतर मासांहारी वन्यप्राण्यांना जंगलातच खाद्यपदार्थ मिळणे गरजेचे आहे. वाघांचा नैसर्गिक अधिवास संरक्षित करून त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news