गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी भेट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे नूतन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दै.'पुढारी' चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री सावंत कोल्हापुरात आले होते.

गुरुवारी सायंकाळी त्यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ आणि 'वेध महामानवाचा' हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दै.'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, जनसुराज्य पक्ष युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news