गोवा : विश्‍वजित-मायकल संघर्ष पेटला

गोवा : विश्‍वजित-मायकल संघर्ष पेटला

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारमधील नगर नियोजन खात्याचे (टीसीपी) मंत्री विश्वजित राणे, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यातील संघर्ष गुरुवारी भलताच पेटला. या दोन युवा नेत्यांमध्ये काही दिवस ओडीपी (बाह्य विकास आराखडा) व पीडीएच्या (नियोजन आणि विकास प्राधिकरण) विषयांवर सुरू असलेल्या संघर्ष आता विकोपाला पोहोेचला. दोघांनीही वैयक्‍तिक टीकेचाही भडिमार केला. यापुढे या संघर्षाला आणखी धार चढण्याचीच मोठी शक्यता आहे. या संघर्षाचा परिणाम न्यायालयीन लढाईतही होऊ शकतो.

गुरुवारी तर राणे यांनी लोबो यांना आपण ओळखत नसल्याचे विधान केले. लोबो नाव गुन्हेगारासारखे वाटते, असा टोलाही त्यांनी हाणला. लोबोेंची दोन मोठी अस्थापने आपण आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतच मोडून टाकणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सकाळी मायकल यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंवर हल्लाबोल केला. राणे हे गोवा आपणच सांभाळू शकतो, असे नाटक करत आहेत. ते कधीच गोव्याचे राखणदार होऊ शकत नाहीत, असे लोबो म्हणाले.

कळंगुटचे आमदार असलेले व बार्देश तालुक्यावर मोठी हुकूमत असलेले नेते म्हणून मायकल यांना ओळखले जाते. सत्तरी तालुक्यावर वर्चस्व असलेले अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते म्हणून विश्वजित यांना ओळखले जाते.

मंत्रिमंडळ बैठक संपवून विश्‍वजित बोहर पडत असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. लोबो यांनी नगर नियोेजन खात्याविषयी उपस्थित केलेल्या मुद्द्यांविषयी विचारणा केली. यावर "कोण मायकल लोबो? आपण त्याला ओळखत नाही' असे प्रतिउत्तर त्यांनी दिले. यावर पत्रकारांनी ' विरोेधी पक्षनेते लोबो, तुमचे मंत्रिमंडळातील माजी सहकारी मायकल लोबो' अशी शब्दांत आठवण करून दिली. मग राणे यांनी नाही 'आपण कुणा मायकल लोबोला ओळखत नाही.

असे प्रतिउत्तर त्यांनी दिले. यावर पत्रकारांनी ' विरोेधीपक्षनेते लोबो, तुमचे मंत्रिमंडळातील माजी सहकारी मायकल लोबो' अशी शब्दांत आठवण करून दिली. मग राणे यांनी नाही 'आपण कुणा मायकल लोबोला ओळखत नाही. नाव तर गुन्हेगारासारखे वाटते' अशा शब्दांत संतापाला वाट करून दिली आणि गाडीत बसून ते लागलीच निघूनही गेले

मायकलची मोेठी अस्थापने मोडणार : विश्‍वजित राणे

मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेच मायकल लोबो यांच्या द बागा डॅकव नाझरी रिसोर्ट या बड्या अस्थापनांना नगर नियोजन खात्याने कारणे दाखवा नोटीस पाठवली. दोन्ही अस्थापने उभी करताना कायदेशीर तरतुदींचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. विश्‍वजित यांनी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत बागा डॅक व नाझरी रिसोर्ट ही दोन्ही अस्थापने आपण मोडून टाकणार असल्याची घोषणा विश्वजित यांनी केली. नगर नियोेजन खात्याच्या लक्षात ज्या ज्या बेकायदेशीर गोष्टी येतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल, असेही ते गरजले.

गोव्याच्या राखणदाराचा विश्‍वजितचा देखावा

नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे अभ्यास न करता निर्णय घेतात. ते कधीच गोव्याचे राखणदार होऊ शकत नाहीत. पर्रा, नागवा, हडफडे येथील बाह्य विकास आराखड्याअंतर्गत दिलेले ना हरकत दाखले व सनद रद्द करून विश्वजित यांनीच नियमभंग केलेला आहे. त्यांच्या या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आपण कोठेही, कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. जे केले आहे ते कायदेशीर आहे. विश्वजित गोवा वाचवण्याची जी भाषा करतात तो त्यांचा देखावा आहे. ते कधीच गोव्याचे राखणदार होऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल मायकल यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news